Pune Cyber Crime | पुण्यातील कुमार प्रॉपर्टीजला ऑनलाइन 50 लाखांचा गंडा, कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन करुन केली फसवणूक
पुणे : Pune Cyber Crime | पुण्यातील नामांकीत बांधकाम व्यावसायिकाच्या नावाने त्यांच्या अधिकाऱ्याला फोन करुन सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) 50 लाखांची फसवणूक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा 48 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, संशय आल्याने सायबर चोरट्यांचा डाव उधळला गेला. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 जुलै ते 10 जुलै दरम्यान कॅम्प परिसरातील कुमार प्रॉपर्टीजच्या कार्यालयात घडला.
याप्रकरणी कंपनीच्या वतीने मितेश प्रयन्त उदेशी (वय-47 रा. टॉवर 4 सी इन्फिनीटी, केशवनगर, मुंढवा) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अग्निवेश राय असे नाव सांगणाऱ्या सायबर गुन्हेगारावर भान्यासं कलम 319(2), 318(4), 3(5) सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मितेश उदेशी हे कॅम्प परिसरातील कुमार प्रॉपर्टीज आणि प्रमोटर्स प्रा. ली. (Kumar Properties) याठिकाणी चीफ मॅनेजिंग ऑफिसर म्हणून काम करतात.ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांना एक मिस कॉल आला. त्यांनी टू कॉलरवर पडताळणी केली असता तो नंबर त्यांचे सीईओ राजस जैन यांचा असल्याचे दिसले. त्यांना परत फोन केला असता त्यांनी तो कट केला. त्यानंतर सायबर चोरट्याने कंपनीच्या लँण्ड लाईन वर फोन करुन राजस जैन बोलत असल्याचे भासवले. (Pune Cyber Crime)
त्याने ऑपरेटला मितेश यांना मोबाईलवर पाठवलेला मेसेज लगेच पाहण्यास सांगा असा निरोप दिला. तसेच मी मिटींगमध्ये असल्याने फोन उचलता येत नसल्याचे सांगितले. मितेश यांनी मेसेज वाचला असता त्यामध्ये अग्निवेश राय या नावाच्या बँक खात्यात 49 लाख 60 हजार 400 रुपये तातडीने ट्रान्स्फर करा असे सांगितले. त्यानुसार फिर्य़ादी यांनी कंपनीच्या बँक खात्यातून पैसे पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मेसेज करुन 48 लाख 60 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. तसेच दुपारी सह्या करतो असे सांगितले.
मितेश यांनी फोन केला मात्र सायबर चोरट्याने फोन कट केला.
त्यामुळे संशय आल्याने फिर्यादी यांनी चौकशी केली असता राजस जैन यांच्याकडे दुसरा मोबाईल नसल्याचे समजले.
त्यामुळे मितेश यांनी राजस यांच्या मुळ मोबाईल क्रमांकावर फोन केला
असता त्यांनी मी असा कोणाताही मेसेज केला नाही किंवा कोणाला पैसे पाठवण्यास सांगितले नाही असे सांगितले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मितेश यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड