Pune Cyber Crime News | अकाऊंटचे मोबाईल नंबर सायबर चोरट्यांना कसे मिळाले? सायबर पोलिसांना पडला यक्ष प्रश्न, एकाचवेळी तीन बांधकाम व्यावसायिकांना फसविण्याचा प्रयत्न
पुणे : (विवेक भुसे) – Pune Cyber Crime News | बांधकाम व्यावसायिक कंपनीचे अध्यक्ष दुबईला गेले असताना त्यांच्या नावाने टेक्स्ट मेसेज पाठवून वेगवेगळ्या लोकांना आरटीजीएस करायला सांगून तब्बल ४ कोटी ६ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक करणार्या सायबर चोरटीला सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) नुकतेच पकडले. जानेवारी, फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या या फसवणुकीत (Online Cheating Fraud Case) सायबर चोरट्यांना या कंपनीतील अकाऊंटचे मोबाईल नंबर कसे मिळाले? एकाच नाही तर त्याच दरम्यान शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकांना अशाच प्रकारे फसविण्यात आले होते. याही बांधकाम व्यावसायिकांकडील अकाऊंटंचा नंबर सायबर चोरट्यांना कसे मिळाले, हा यक्ष प्रश्न सायबर पोलिसांना पडला आहे.
बांधकाम व्यावसायिकाला गंडा घालणार्या सायबर चोरट्यांच्या साखळीपैकी सानिया ऊर्फ गुड्डीया मोहम्मद मुस्तकीम साहब सिद्दीकी (वय २१, रा. लोहरपत्ती, गोपालगंज, बिहार) हिला सायबर पोलिसांनी नुकतीच गोपालगंज येथून पकडले. सानिया हिच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते़ तसेच तिच्या मोबाईल नंबरवरुन मेसेज केले गेले होते.
बांधकाम व्यावसायिकांच्या वेबसाईटवर प्रामुख्याने कंपनीचे महत्वाचे लोकांचे, मार्केटिंग विभागातील लोकांचे ज्यांचा लोकांशी संपर्क येतो, त्यांचे मोबाईल नंबर, कार्यालयाचे नंबर दिले जातात. ज्यांचा लोकांशी संपर्क येत नाही, हे ऑफिसमध्ये काम करतात. विशेषत: आर्थिक व बँकेशी संबंधित काम पाहतात, यांचे मोबाईल नंबर दिले जात नाही. असे असताना त्यांचे मोबाईल नंबर सायबर चोरट्यांना मिळाले होते. त्यामुळेच त्यांनी थेट कंपनीच्या अध्यक्षांच्या नावाने हा माझा प्रायव्हेट नंबर असून कोणाला शेअर करु नका, असे सांगून बँकेचे व्यवहार पाहणार्या अधिकार्याला टेक्ट मेसेज गेले. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातही अशा प्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. (Pune Cyber Crime News)
याबाबत सायबर पोलीस ठाण्याच्या (Cyber Police Station Pune) पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे (PI Swapnali Shinde)
यांनी सांगितले की, बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणार्या बँकेशी संबंधित व्यवहार पाहणार्या
अधिकार्यांचे मोबाईल नंबर सायबर चोरट्यांच्या हाती कसे पडले, याचा तपास केला जात आहे.
संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीला त्याबाबत खुलासा करण्यासाठी पत्र पाठविले आहे.
अशाच प्रकारे शहरातील आणखी काही बांधकाम व्यावसायिकांची फसवणूक करण्याचे प्रयत्न याच काळात घडला होता.
बँकेशी संबंधित या अधिकार्यांचे मोबाईल नंबर सायबर चोरट्यांपर्यंत पोहचले कसे. तसेच कंपनीचे प्रमुखांच्या नावाने नेमके याच अधिकार्यांना टेक्स्ट मेसेज गेले कसे हा प्रश्न आम्हालाही पडला आहे. कंपनीशी संबंधित लोकांकडूनच सायबर चोरट्यांपर्यंत हे नंबर पोहचले का याचा शोध घेतला जात आहे.
आपण कोणालाही आपला मोबाईल नंबर देत असतो. आपण करत असलेले काम,
आपल्यावरील जबाबदारी याचे भान ठेवूनच आता लोकांनी आपला संपर्क क्रमांक देण्याची आवश्यकता आहे.
सायबर गुन्ह्यांची वाढती व्याप्ती लक्षात घेता जबाबदार पदावर असलेल्या लोकांनी अशा
वेळी दोन वेगवेगळे नंबर वापरणे अत्यावश्यक झाले आहे. (Pune Cyber Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत