Pune Cyber Crime News | पेंटरने डी मॅट अकाऊंट हॅक करुन केली कोट्यावधीची फसवणूक; सायबर पोलिसांनी चेन्नईहून केली अटक
पुणे : Pune Cyber Crime News | व्यावसायिकाच्या डी मॅट अकाऊंट हॅक (D Mat Account Hacking) करुन त्यावर येणारे शेअर्स स्वत:चे अकाऊंटवर घेऊन त्याची विक्री करुन कोट्यावधींची फसवणूक (Online Cheating Fraud Case) करणार्या पेंटरला सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) चेन्नईहून अटक केली आहे. अशाच प्रकारे त्याने ७ ते ८ जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Cyber Crime News)
व्यंकटेशन वर्धन (Venkatesh Vardhan) असे या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील फिर्यादीची त्याने ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. चेन्नईमध्ये तो पेंटरचे काम करत असल्याचे सांगतो.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील फिर्यादी यांचे डी मॅट अकाऊंटचा प्रायमरी मेल आय डी व प्रायमरी मोबाईल क्रमांक आरोपीने अनाधिकृतपणे बदलून त्याठिकाणी स्वत:चा मेल आय डी व मोबाईल क्रमांक लिंक करत असे. त्यातून डी मॅट अकाऊंटवरील शेअर्स स्वत:चे डी मॅट अकाऊंटला ट्रान्सफर केले. फिर्यादी यांचे ७० लाख रुपयांचे शेअर्स आरोपीने फिर्यादीचे सीडीएसएल या डिपॉझिटरीला लिंक असलेल्या डी मॅट अकाऊंट हॅक करुन स्वत:चे बजाज सिक्युरिटीज डी मॅट अकाऊंटला ट्रान्सफर करुन घेतले. त्यानंतर हे शेअर्स विकून स्वत:च्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात ही रक्कम वर्ग करुन घेतली. नंतर त्या खात्यातून चेकद्वारे व एटीएममधून त्याने ही रक्कम काढून घेतली.
अशाच प्रकारे व्यंकटेशन वर्धन याने छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलीस ठाण्यात एकाची २ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याशिवाय त्याने आणखी ७ ते ८ जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक हिमालय जोशी यांनी सांगितले की, व्यंकटेशन वर्धन हा आपण पेंटर असल्याचे सांगतो. तो कोणाकडून तरी हा डाटा घेऊन हे कृत्य करीत असल्याचे दिसून येत आहे. त्याला दोन मुली व जावई आहेत. त्याने या पैशांमधून होमलोन फेडल्याचे दिसून येत आहे. त्याने डिमेट अकाऊंट आय डी व पासवर्ड सीडीएसएलमधून कशाप्रकारे मिळवला, याचा तपास करीत आहे.
अशा प्रकारे अन्य कोणासोबत फसवणूक झाली असल्यास त्यांनी सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,
असे आवाहन करण्यात येत आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे,
पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक हिमालय जोशी,
सचिन इनामदार, रवी राठोड, दिनेश मरकड, सचिन शिंदे यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक
Pune Flood | पुणेकरांनो काळजी घ्या, शहरात पुराच्या दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका!
पुणे महापालिकेने केले आवाहन
Sharad Pawar On Maratha-OBC Reservation | मराठा-ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांनी
व्यक्त केली चिंता, ”तेथील कटुता, अवविश्वासाचं चित्र भयावह, मी कधीही असं…”