Pune Daund ACB Trap Case | दौंड नगरपरिषदेला सुरक्षा रक्षक, कामगार पुरवणाऱ्या एजन्सीला दरमहा लाच मागणे लेखाधिकारी, क्लार्कला पडले महागात, लाच मागितल्याच्या दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : Pune Daund ACB Trap Case | दौंड नगरपरिषदेस सुरक्षा रक्षक तसेच कुशल, अकुशल कामगार पुरविणार्या एजन्सीकडून बिल काढल्यानंतर दरमहा लाच मागणे लेखाधिकारी व क्लार्क यांना चांगलेच महागात पडले. लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने ८ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखाधिकारी भाग्यश्री भालचंद्र येळवे Bhagyashree Bhalchandra Yelve (वय २९, रा. रामदरा, लोणी काळभोर), क्लार्क ओंकार संजय मेणसे Omkar Sanjay Mense (वय ३७, रा. हुडको कॉलनी, शिरुर) अशी त्यांची नावे आहेत.
तक्रारदार व त्यांची पत्नी यांच्या एजन्सीमार्फत दौंड नगर परिषदेस सुरक्षा रक्षक तसेच कुशल, अकुशल कामगार पुरविले जातात. सेवा पुरविल्यानंतर काढलेल्या बिलाचे बक्षीस म्हणून दौंड नगरपरिषद येथील लेखाधिकारी भाग्यश्री येळवे हे प्रति महा १० हजार रुपये व क्लार्क ओंकार मेणसे हे प्रति महा ५ हजार रुपये मागणी कर. तसेच मुख्याधिकारी विजय काळवे हे तक्रारदार यांच्याकडे त्यांचे एजन्सीने पुरविलेल्या सेवेकरीता काढलेल्या देयकासाठी एका एजन्सीकरीता २५ हजार रुपये व दुसर्या एजन्सीकरीता २० हजार रुपयांची बक्षीस म्हणून मागणी करत असल्याचे तसेच त्यांनी पुरक आदेश काढण्याकरीता १० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार ६ मार्च २०२५ रोजी करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणीबाबत ७ मार्च २०२५ रोजी व १० मार्च २०२५ रोजी पडताळणी केली. त्यात येळवे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे स्वत: करीता १४ हजार किंवा १५ हजार रुपये व मुख्याधिकारी यांच्याकरीता ४५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच क्लार्क ओंकार मेणसे याने तक्रारदाराच्या काढलेल्या मागील दोन महिन्यांच्या देयकाचे बक्षीय म्हणून स्वत: करीता ५ हजार रुपये व येळवे यांच्याकरीता १० हजार ५०० रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आता लाच मागणीचा गुन्हा दौंड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ यांनी केली असून सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे करीत आहेत.
