Pune FDA | अन्न व औषध प्रशासनामार्फत पुण्यात धडक मोहिम ! 14 लाख 35 हजार 958 किंमतीचा साठा जप्त

FDO-Pune

पुणे: Pune FDA | गणेशोत्सव काळात अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयामार्फत पुणे विभागामध्ये अन्न आस्थापनेच्या १०१ तपासण्या करण्यात आल्या असून या मधून दुध, खवा, पनीर, स्वीट मावा, तुप, चटर व नमकीन इत्यादी अन्न पदार्थाचे एकूण ११७ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. यामध्ये अन्न पदार्थाचा एकूण ९ लाख १९ हजार ५२० रुपयांचा किंमत्तीचा साठा जप्त करण्यात आला. पुणे जिल्हा व पुणे विभागात असे एकूण १४ लाख ३५ हजार ९५८ किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

या मोहिमेत जिल्ह्यात अन्न आस्थापनेच्या ४८ तपासण्या करण्यात येऊन दुध, खवा, पनीर, स्वीट मावा, तुप, बटर व नमकीन इत्यादी अन्न पदार्थाचे एकूण ५३ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या विश्लेषण अहवाला मार्फत प्राप्त होताच कायद्याप्रमाणे कारवाई करून भेसळीच्या संशयावरुन विविध अन्न पदार्थाच्या धाडी घालुन जप्ती करण्यात आली. या कालावधीमध्ये पुणे कार्यालयाने गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा व वनस्पती इत्यादी अन्न पदार्थाचा एकूण ५ लाख १६ हजार पेक्षा अधिक किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

संबधीत कारवाई अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील सर्व सहायक आयुक्त या अन्न सुरक्षा अधिकारी
यांचे मार्फत सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन राज्य पुणे तसेच आयुक्त, अन्न व औषध प्रशासन,
मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली पार पडण्यात आली, सणासुदीच्या दरम्यान विक्री करण्यात येणा-या अन्न पदार्थामध्ये भेसळी
संदर्भात काही संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५
यावर संपर्क साधावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे पुणे यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | सराईत वाहनचोराकडून ६ मोटारसायकली हस्तगत ! भोसरी, चाकण, चिंचवड, शिर्डी, सोलापूर येथे केल्या होत्या चोर्‍या (Video)

Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!

MCOCA Action On Enjoy Group | जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपवर मोक्का कारवाई (Video)

You may have missed