Pune Fire Brigade | अग्निशामक दलाच्या धाडसी जवानांचा भाजपा युवा – युवती मोर्चातर्फे सन्मान !

Pune Fire Brigade

पुणे : Pune Fire Brigade | शहरातील पूर परिस्थितीत अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांनी धाडस दाखवत पुरात सापडलेल्या नागरिकांना मदत केली व त्यांना या आपत्कालिन परिस्थितीत सुखरुप बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा (BJP Yuva Morcha Pune) आणि भारतीय जनता युवती आघाडीच्या (BJP Yuvati Aghadi Pune) वतीने अग्निशमन दल मुख्यालयात सन्मान करण्यात आला.

यावेळी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष करण मिसाळ (Karan Misal) यांनी अधिकारी व जवानांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक करीत प्रत्येक आपत्कालिन परिस्थितीत अग्निशमन जवानांचे कार्य मोलाचे असल्याचे सांगत आभार मानले तर युवती मोर्चाच्या शहराध्यक्ष मनिषा धारणे (Manisha Dharne) यांनी दलाविषयी कृतज्ञता व्यक्त करत कुठल्याही संकटकाळात क्षणात मदतीसाठी धावणारे हे जवान आम्हा पुणेकरांसाठी सुरक्षिततेची भावना निर्माण करतात असे म्हटले.

“आम्ही जेव्हा आमचे कर्तव्य बजावत असतो त्यावेळी समाजाकडून विविध स्वरुपात जो सन्मान मिळतो तेच आमच्या दलाचे मनोबल उंचावते. आमच्या दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे (Devendra Potphode) यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव समाजाच्या रक्षणासाठी कार्यरत असतो.”

  • रमेश गांगड, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, मनपा पुणे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune News Railway Line | आता लोणावळ्याशिवाय मुंबई-पुणे असा प्रवास करता येणार; रेल्वेकडून प्रस्ताव तयार

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या – “संसदेत बोललं की नवऱ्याला आयकरची नोटीस येते”

Yerawada Pune Crime News | अपघाताची नुकसान भरपाई देण्याच्या वादातून तरुणावर टोळक्याने केले कोयत्याने वार

Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये

You may have missed