Pune Fire In Diwali | दिवाळीत आगीच्या वाढत्या घटना ! या दिवाळीत विक्रमी ६० घटनांची नोंद, सुदैवाने जिवित हानी नाही
पुणे : Pune Fire In Diwali | प्रदुषणामुळे फटाके उडवू नयेत असे आवाहन केले जात असताना दुसरीकडे फटाक्यांच्या आवाजाबरोबरच त्यामुळे लागणार्या आगींमध्ये दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. या दिवाळीत फटाक्यामुळे आगी लागण्याच्या तब्बल ६० घटना घडल्या. सुदैवाने त्यात कोणतीही जिवित हानी झाली नाही.
दिवाळीच्या सुरुवातीच्या २८ ते ३१ ऑक्टोबर या तीन दिवसात आगीच्या केवळ ६ घटना घडल्या. त्यानंतर १ नोव्हेबरला लक्ष्मीपुजनाच्या दिवशी तब्बल ३६ आगीच्या घटना घडल्या. २ नोव्हेबर रोजी पाडव्याला १४ घटना आणि ३ नोव्हेबरला भाऊबीज दिवशी ४ आगीच्या घटना घडल्या.
या आगीमध्ये सर्वाधिक आगी या झाडाला लागल्या आहेत. त्यानंतर कचरा, टेरेस, गवताला आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या चार वर्षात यंदा आगीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत.
२०२३ मध्ये ३५ घटना
२०२२ मध्ये १९ घटना
२०२१ मध्ये २१ घटना
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा