Pune Fire News | पुणे : माऊलींच्या पालखीत सिलेंडरने घेतला पेट, दलाच्या जवानांकडून वेळीच आग आटोक्यात

cylinder caught fire in Mauli's palkhi

पुणे : Pune Fire News | आज (गुरुवार) सकाळी सुमारे दहा वाजता सासवड – जेजुरी रस्ता, वाळुंज फाटा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गस्थ होत असताना पुढे दिंडी क्रमांक 78 मधील वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरु असताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याची घटना घडली होती. तिथे असलेल्या वारकऱ्यांनी वाळू मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला व त्याचवेळी पालखीमध्ये बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन वाहनास संपर्क साधण्यात आला होता.

पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचले. जवानांनी पेटलेला सिलेंडरवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये कोणी जखमी झाले नाही.

Pune Fire News पुणे अग्निशमन दलाचे वाहन गेली कित्येक वर्ष आळंदी ते पंढरपुर माऊलींच्या सुरक्षतेकरिता तसेच आग व आपत्कालिन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी म्हणून अग्निशमन अधिकारी व जवानांसह तैनात असते. इतर महानगरपालिका, पीएमआरडीए व नगरपालिका व इतर अग्निशमन वाहनेदेखील बंदोबस्त करिता असतात. आज घडलेल्या घटनेमुळे पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने उपस्थित वारकरी समुदाय यांनी जवानांचे आभार मानले.

पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी ही अधिकारी व जवानांचे कौतुक केले.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, वाहनचालक नारायण जगताप,
तांडेल विलास दडस, फायरमन श्री बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले व अटेंडंड युवराज गवारी यांनी सहभाग घेतला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”

You may have missed