Pune Firing Case | पुणे : सासवड येथे भरदिवसा गोळीबार, आईस्क्रीम विक्रेता गंभीर जखमी

Saswad Pune Firing Case

पुणे : Saswad Pune Firing Case | पुरंदर तालुक्यातील (Purandar Taluka) सासवड येथे भरदिवसा गोळीबार (Firing In Purandar) केल्याची घटना घडली आहे. तीन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. गजबजलेल्या एसटी बसस्थानक परिसरात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना एसटी स्टँड समोर गुरुवारी (दि.18) दुपारी 3.50 च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड येथील बसस्थानक समोर आज दुपारी 3.50 च्या सुमारास ही घटना घडली आहे. तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केला. यात 41 वर्षीय राहुल नामदेव टिळेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सासवड येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Pune Firing Case)

सासवड एसटी बस स्थानकासमोर टिळेकर हे आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करतात, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटना घडल्यानं सासवड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.
पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल

You may have missed