Pune Flood | पुणेकरांनो काळजी घ्या, शहरात पुराच्या दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका! पुणे महापालिकेने केले आवाहन

Pune PMC News | The work of transporting dry waste to cement companies has been extended for the fourth time; Solid Waste Department and senior officials struggle for the preferred contractor

पुणे : Pune Flood | अतिवृष्टी आणि त्यानंतर खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) केलेल्या विसर्गामुळे पुणे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले होते (Pune Rains). यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुराच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होऊ शकतात. दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Pune Flood)

याबाबत आरोग्य विभागाने केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, दूषित पाणी पिल्यास अतिसार, थंडी, ताप यांसारखा त्रास होऊ शकतो. अशी लक्षणे आढळल्यास आशा सेविका, परिचारिका, आरोग्य सेवकांकडून त्वरित उपचार करून घ्यावेत. तसेच नजीकच्या महापालिकेच्या दवाखान्यात संपर्क साधावा.

जुलाब आणि अतिसारात जलशुष्कतेसाठी ओआरएस तथा जलसंजीवनीचा (साखर, मीठ, पाणी) वापर करावा. जुलाब, अतिसार, काविळीची साथ असल्यास पिण्याच्या पाण्यात क्लोरीन लिक्विड टाकूनच प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

  • इमारतीच्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करून घ्या.
  • नळ गळती, व्हॉल्व गळती असेल तर दुरुस्त करा, टाकीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा.
  • साठवणुकीचे पाणी झाकून ठेवा, ५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवू नका.
  • आठवड्यातील एक कोरडा दिवस पाळा. पिण्याच्या पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून धुवून, पुसून आणि कोरडी करा.
  • डासांच्या अळ्या पाण्यामधे होऊ देऊ नका. साथीचे आजार बळावल्यास महापालिकेच्या दवाखान्यांतील डॉक्टरांना दाखवा.
  • पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करा. पिण्याचे पाणी उकळून व गार करून झाकून ठेवा.
  • वापरात नसलेल्या विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरू नका.
    उघड्यावरचे अन्न व शिळे अन्न खाऊ नका.
  • शौचाहून आल्यानंतर व जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC On Unauthorized Construction | कंपाउंडींग फी आकारून अनधिकृत बांधकाम नियमान्वीत करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महापालिकेची सर्वोच्च न्यायालयात धाव

Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी

Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता

Chandrakant Patil-Pune Flood | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी

Murlidhar Mohol – Pune Flood | केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

You may have missed