Pune Ganeshotsav | पुण्यातील गणेशोत्सवात 10 दिवस दारूविक्री बंद?; गणेश मंडळांची मागणी
पुणे : Pune Ganeshotsav | ढोलताशांचा गजर, मधुर सुर, पारंपरिक पोषाखात नटलेली तरुणाई तसेच चहूबाजूंनी घुमणारा बाप्पाचा आवाज, या जयघोषात लाडक्या गणरायाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात. यंदाच्या गणेशोत्सवाबाबत तयारी सुरु झालेली आहे. (Ban On Alcohol During Ganeshotsav)
दरम्यान विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल आणि डीजेसंदर्भात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. याबाबत प्रत्येक मंडळांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली जाईल. गणेश उत्सव उत्साहात मात्र नियमात साजरा व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असेल. विसर्जन मिरवणुकीत एका मंडळाच्या समोर किती ढोल पथके असणार याचा निर्णय पुढच्या बैठकीत घेण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी दिली.
काही गणेश मंडळांनी गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद (ड्राय डे) ठेवण्यात यावा, अशी मागणी केली त्यावरही याबाबत जनभावना काय आहे याचा विचार करून निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. (Pune Ganeshotsav)
या बैठकीला शहरातील ३०० मंडळांचे ६०० प्रतिनिधी होते. यावेळी सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), प्रवीण पाटील (IPS Pravinkumar Patil) आणि मनोज पाटील (IPS Manoj Patil) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत त्यांच्या सूचना मांडल्या.
यावेळी बोलताना अमितेश कुमार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी २०२२ मध्ये घोषणा केली होती त्याप्रमाणे गेल्यावर्षी ज्या गणेश मंडळांनी परवानगी घेतली आहे त्यांना ५ वर्ष परवानगी घेण्याची गरज नाही. तसेच नवीन मंडळांसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात येणार आहे. अनेक गणेश मंडळे हे वर्गणी न घेता उत्सव मंडळात स्टॉलला परवानगी देताना, या वेळी वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी.
तसेच कमानी उभारताना देखील वाहतुकीचा विचार करून नियमात बसेल अशा पद्धतीने उभाराव्यात.
या संदर्भात स्थानिक पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
विसर्जन मिरवणुकीच्या वेळेसंदर्भात प्रत्येक झोननुसार बैठका घेतल्या जाणार आहेत.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
कार्यकर्त्यांनी ठरवले तर सगळे काही वेळेवर होईल. मागच्या काही दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले,
पण पावसामुळे पुन्हा खड्डे पडले. गणेशोत्सवादरम्यान मात्र पोलिस (Pune Police) आणि
महापालिकेकडून (Pune Municipal Corporation – PMC) पुन्हा खड्डे बुजवले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये