Pune Ganeshotsav | पुण्यातील गणेशोत्सवात नवीन मंडळांसाठी नियमावली; मिरवणुकीच्या एका पथकात ५० ढोल अन् १० ताशा
पुणे : Pune Ganeshotsav | सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. दरम्यान पुण्यातील गणेशोत्सवाबाबत पोलिसांकडून मंडळांना मिरवणूक, वाहतूक कोंडी याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच नव्या मंडळाच्या परवानगीसाठी असलेल्या अटी-शर्ती यांची यादी पोलिसांनी जाहीर केली आहे.
यंदा गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात ५० ढोल अन् १० ताशांना पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी परिसरातील मैदाने, शाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे. (Pune Ganeshotsav)
गेल्यावर्षी एका गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका ढोल पथकात ५० ढोल आणि १० ताशा अशी संख्या निश्चित करण्यात आली होती. यंदा देखील तीच संख्या निश्चित करण्यात आली असून, जास्तीत जास्त ३ ढोल पथकांचा समावेश गणेश मंडळांना करता येणार आहे. ती संख्या निश्चित करून पोलिसांना सांगा, अशा सूचना देखील गणेश मंडळांना करण्यात आल्या आहेत.
शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी पोलिसांकडून आम्हाला सकारात्मक सहकार्य मिळत असून मंडळांनी देखील पोलिसांना सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी परिसरातील मैदाने, शाळा याठिकाणी पार्कींगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी गणेश मंडळांनी पोलिसांकडे केली.
नवीन मंडळांच्या परवानगीसाठी असलेल्या अटी-शर्ती खालीलप्रमाणे,
- २०२२ मध्ये परवानगी घेतलेल्या गणेश मंडळांना २०२६ पर्यंत (५ वर्षे) परवानगी
- नवीन गणेश मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी व त्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे
- मिरवणुकीत देखाव्यांची उंची जमिनीपासून १४ फुटांपेक्षा जास्त आणि रुंदी १० फुटांपेक्षा जास्त नसावी
- रात्री १० पर्यंत कार्यक्रमांना परवानगी
- कमान, स्टेज आणि मंडप उभारण्यासाठी अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र,
वाहतूक शाखेचे, विद्युत जोडणीसाठी विद्युत निरीक्षकाचे प्रमाणपत्र यासाठी एक खिडकी योजना - परवानगी घेतलेल्या आकाराचाच मंडप उभारणे आवश्यक
- गणेश मंडळात सीसीटीव्ही असणे बंधनकारक
- महिलांची छेडछाड होणार नाही याबाबत दक्षता ठेवणे गरजेचे
- धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे
- प्रखर बीम लाइट नको
- दोनच स्पीकर लावून आवाजाची मर्यादा पाळावी
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य