Pune Hadapsar Crime News | घरफोडी, वाहनचोरी करणार्‍या अल्पवयीन चोरट्यांकडून पाच गुन्हे उघडकीस

pune-police-arrest

पुणे : Pune Hadapsar Crime News | रात्री घरफोडी (Burglary), वाहनचोरी (Vehicle Theft) करणार्‍या दोघा अल्पवयीन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने (Pune Crime Branch Unit 4) पकडून त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांची तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

बाणेर परिसरात ५ डिसेंबर रोजी गुन्हे शाखेचे युनिट ४ चे पथक बाणेर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अजय गायकवाड व वैभव रणपिसे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आठ दिवसांपूर्वी बाणेर गाव येथे घरफोडी करणारे अल्पवयीन मुलगा हडपसर गाडीतळ येथे रस्त्याच्या कडेला एका दुचाकीवर बसून कोणाची तरी वाट पहात आहे. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन पाहिले असता दोघे जण तेथे आढळून आले. पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केली. दोघांनी मिळून बाणेर गाव येथील बंद घराचे लॉक तोडून घरामधील कपाट उचकटून त्यातील सोन्याचे दागिने चोरल्याचे सांगितले. चोरी केलेले सोन्याचे दागिने त्यांचे ओळखीच्या साथीदाराकडे विक्री करण्यासाठी दिले आहेत.

त्यांच्याकडील मोटारसायकलबाबत विचारणा केल्यावर त्यांनी ती हडपसर माळवाडी येथून चोरल्याचे सांगितले. हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता हडपसरमधील २ तर, बंडगार्डनमधील एक अशा तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांची तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (Addl CP Shailesh Balakwade), पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (DCP Nikhil Pingle),
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (ACP Rajendra Mulik)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Senior PI Ajay Waghmare),
पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम (PSI Vaibhav Magadum), दिगंबर चव्हाण, सहायक फौजदार यास्मीन सय्यद,
पोलीस अंमलदार हरिष मोरे, अजय गायकवाड, प्रविण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, संजय आढारी, विशाल गाडे,
विनोद महाजन, एकनाथ जोशी, नागेशसिंग कुंवर, जहांगिर पठाण, मनोज सांगळे, वैभव रणपिसे, देविदास वाढंरे,
राहुल परदेशी, सुभाष आव्हाड, भरत गुंडवाड, विशाल ईथापे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे, शितल शिंदे यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sangli Crime News | शेततळ्यात बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू ; तळ्याजवळ खेळत असताना घडली दुर्घटना

Pune Swargate Crime News | भरदिवसात गर्दीने भरलेल्या बसमध्ये तरुणीशी अश्लिल कृत्य; मैत्रिणींनी खडसावले, स्वारगेटजवळील प्रकार