Pune Hit & Run Case | पुणे : पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा प्रकार, कार चालक बदलला; सखोल चौकशीची मागणी

Accident

पुणे : Pune Hit & Run Case | पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरण (Pune Porsche Car Accident Case ) ताजे असताना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीत हिट अँड रनचा प्रकार घडला आहे (Kalyani Nagar Car Accident Pune). दुचाकीवरून जाणाऱ्या तीन युवकांना समोरुन येणाऱ्या कारने (एमएच 12 यु एस 3562) धडक देऊन गंभीर दुखापत केली. याप्रकरणी नवनाथ चोरमोले (रा. शिरसवडी ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुमार जयसिंग ढोरे (वय-36 रा. ढोरेवस्ती, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे दोन मित्र नवनाथ हरगुडे, विनायक ढोरे हे पुणे नगर रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करुन स्कूटर वरुन सव्वा दहाच्या सुमारास जात होते. कोलते वेअर हाऊस समोरून जात असताना समोरून केसनंद कडून लोणीकंद कडे जाणारी टाटा टोगोर चा चालक नवनाथ चोरमले याने त्याच्या ताब्यातील कार ही हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांना जोरात धडक दिली. या अपघातात कुमार ढोरे यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. तर स्कूटर चालक विनायक ढोरे याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे.

तसेच स्कूटरवरील मध्ये बसलेला नवनाथ हरगुडे याचा उजवा पाय अपघातात फ्रॅक्चर झाला आहे. तर स्कूटरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर खराडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दुसऱ्याच व्यक्तीला केले आरोपी

अपघात प्रकरणातील कार मधील मद्यप्राशन केलेल्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यातील डोंगरगाव येथील गायकवाड नावाचा व्यक्ती आरोपी असल्याचे जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले होते. तरी देखील पोलिसांनी दुसऱ्याच व्यक्तीला आरोपी केल्याचा प्रकार घडला असल्याचा आरोप अपघातग्रस्त यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच पोलिसांनी योग्य वागणूक दिली नसल्याचा आरोप केला आहे. (Pune Hit & Run Case)

चालक बदलला…

जखमींच्या नातेवाईकांनी आरोप केल्यानंतर पोलिसांनी आरोपी नवनाथ चोरमले याच्याकडे सखोल चौकशी केली
असता हा गुन्हा केला नसल्याचे व गुन्हा अंगावर घेण्यासाठी डोंगरगाव येथील गायकवाड नावाच्या व्यक्तीने दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला.
चौकशी दरम्यान दुसराच आरोपी असल्याची बाब देखील निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात संबंधित पोलिसाची चौकशी होणार असून याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येणार
असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर (Sr PI Savalaram Salgaonkar ) यांनी दिली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed