Pune Hit & Run Case | पुणे : लोहगाव परिसरात हिट अँड रन; ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, चालकाने मद्यप्राशन केल्याचे उघड

Accident

पुणे : Lohegaon Pune Hit & Run Case | आजारी प्राण्यांची रुग्णालयात ने-आण करणाऱ्या ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव भागात घडली आहे. अॅम्ब्युलन्स चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले असून, विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लोहगावमधील फॉरेस्ट पार्क रस्ता (Lohegaon Forest Park Road) परिसरात ही घटना घडली आहे.

सुरेंद्रसिंग शैलेंद्रसिंग कुम्पावत (वय 48, रा. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, चंदननगर, खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्राण्यांची ने-आण करणाऱ्या ॲम्ब्युलन्सचालक (एमएच 14 के एन 4364) संजय चण्णाप्पा मुल्लोळी (वय 26, रा. वाडेबोल्हाई, नगर रस्ता, ता. हवेली) याला अटक करण्यात आली. याबाबत मयत सुरेंद्रसिंह यांचा लहान भाऊ महेंद्रसिंग शैलसिंग कुम्पावत (वय-43 रा. नवी भाजी मार्केट, चंदननगर-खराडी रोड, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Lohegaon Pune Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्रसिंह शनिवारी (दि.13) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास लोहगाव भागातील फॉरेस्ट पार्क परिसरातून जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या रुग्णवाहिकेने रस्ता ओलांडणाऱ्या सुरेंद्रसिंग यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्रसिंग यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गुन्हे सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी मुल्लोळ याला ताब्यात घेतले. आरोपील मुल्लोळ याने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन मध्यरात्री अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड