Pune ISIS Module | पुणे आयसिस मॉड्युलच्या वॉन्टेड सदस्याला दिल्लीत अटक; बॉम्बस्फोट घडवण्याचा रचला होता कट

Rizwan Abdul Ali Arrested By Delhi Police

दिल्ली : Pune ISIS Module | मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्वाच्या शहरात बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांना काही महिन्यांपूर्वी पुण्यातून अटक करण्यात आली होती. पुण्यातील कोंढव्यामध्ये एका इमारतीत या दहशतवाद्यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर आले होते. (Pune ISIS module-linked terrorist Rizwan Abdul Ali arrested by Delhi Police)

त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास करत काही जणांना अटक केली. आता या प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत गेल्याचे समोर आले आहे. दिल्लीत या प्रकरणाशी संबंधित महत्वाच्या आरोपीला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. (Delhi Police Special Cell)

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आज (दि.९) सकाळी पुणे आयसिस मॉड्यूलचा महत्वाचा सदस्य रिझवान अब्दुल हाजी अली याला अटक केली. अलीवर तीन लाख रुपयांचे बक्षीस होते. रिझवान अली हा या प्रकरणातील महत्वाचा आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.

अलीच्या अटकेसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वॉरंट जारी केले होते. पुणे पोलिसांच्या तावडीतून पळाल्यानंतर तो पकडले जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होता. मात्र दिल्ली पोलिसांनी त्याला अखेर अटक केली.

दिल्लीतील दर्यागंज येथील रहिवासी असलेल्या अलीने पुणे आयसिस मॉड्यूलच्या इतर सदस्यांसह दिल्ली आणि मुंबईतील अनेक हाय-प्रोफाइल आणि महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती गोळा केली होती. पोलिसांनी अलीच्या ताब्यातून काही शस्त्रे देखील जप्त केली आहेत. पुणे आयसिस मॉड्यूल च्या अनेक सदस्यांना पुणे पोलीस आणि एनआयएने यापूर्वीच अटक केली आहे.

हे आरोपी सिक्रेट कम्युनिकेशन अँप्स द्वारे त्यांच्या परदेशातील हँडलच्या संपर्कात असल्याचेही तपासात समोर आले आहे.
हे आरोपी सशस्त्र दरोडे आणि चोरी करून दहशतवादी कारवाईसाठी निधी गोळा करत होते.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जुलै २०२३ मध्ये पुण्यात शस्त्रे, स्फोटके,
रसायने आणि आयसिसशी संबंधित साहित्य बाळगल्याप्रकरणी एकूण ११ जणांवर आरोपी ठरवलं होतं.
मार्चमध्ये एनआयएने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात रिझवान अलीसह अन्य तीन आरोपींची नावे होती.
यातील सर्व आरोपी हे दहशतवादी संघटना आयसिसचे सदस्य होते.
दहशतवादी कारवायांचा पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी त्यांनी मोठा कट रचला होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन

You may have missed