Pune Kothrud Crime News | दारुच्या नशेत तिघांनी तरुणावर केला हल्ला; कोथरुडमध्ये राडा करणार्‍या तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा, बेशुद्ध होईपर्यंत केली मारहाण

marhan

पुणे : Pune Kothrud Crime News | दारु पिल्यानंतर किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीत तिघांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या डोक्यात सिमेंटची वीट घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. कर्वेनगरमधील चांदणी बार (Chandni Bar) ते कोथरुडमधील कोकण एक्सप्रेस (Konkan Express in Kothrud) दरम्यान राडा करणार्‍या या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे.

ओंकार विजय स्वामी Omkar Vijay Swamy (वय २७, रा. गगनगिरी कॉलनी, आशिष गार्डन, कोथरुड) हा तरुण या मारहाणीत बेशुद्ध पडला होता. डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर आता त्याची तब्येत सुधारली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलीस अंमलदार प्रकाश चव्हाण यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हेमंत ऊर्फ लोकेश सुरेश माथवड (वय २९), शुभम रामभाऊ मोकाटे (वय २९, रा. ओमकार पुरम सोसायटी, आझादनगर, कोथरुड), नचिकेत ऊर्फ अजिंक्य गंगाधर ओव्हाळ (वय २६, रा. श्रावणधारा वसाहत, शिवतारा गार्डन, सोसायटी, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार शुक्रवारी पहाटे एक ते अडीच वाजेच्या दरम्यान कर्वेनगर येथील चांदणी बार अँड रेस्टॉरंट ते कोथरुडमधील कोकण एक्सप्रेस दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी चांदणी बार मध्ये मद्यप्राशन केले. त्यानंतर पहाटे एक वाजेच्या सुमारास ते बारच्या बाहेर थांबले असताना त्यांचा ओंकार स्वामी याच्याबरोबर वाद झाला. त्यावेळी शुभम याने हातामध्ये फरशी घेऊन स्वामी याच्या पाठीवर मारली. हेमंत याने तेथील झाडाची कुंडी उचलून पाठीवर फेकून मारली. त्यानंतर ओंकार हा घाबरुन पळून लागला. तेव्हा तिघांनी त्याचा पाठलाग केला. कोकण एक्सप्रेस चौकाजवळील विघ्नहर्ता मोबाईल शॉपीसमोर त्यांनी स्वामीला पकडले. शुभम याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

नचिकेत याने तेथे पडलेली सिमेंटची वीट उचलून स्वामीच्या डोक्यात मारली.
तिघांनी स्वामीच्या तोंडावर, पोटावर, पायावर, डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
हा प्रकार होत असताना रस्त्याच्या पलिकडे लोकांची गर्दी झाली.
तेव्हा शुभम मोकाटे याने दुभाजकावर उभे राहून पलीकडे थांबलेल्या लोकांना हातवारे करुन त्यांना निघून जाण्यास सांगून दहशत निर्माण केली.
या मारहाणीमुळे ओंकार स्वामी बेशुद्ध पडला.
पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन स्वामी याला रुग्णालयात दाखल केले.
स्वामी बेशुद्ध असल्याने पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली.
सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील (API Sachin Patil) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sangli Crime News | शेततळ्यात बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू ; तळ्याजवळ खेळत असताना घडली दुर्घटना

Pune Swargate Crime News | भरदिवसात गर्दीने भरलेल्या बसमध्ये तरुणीशी अश्लिल कृत्य; मैत्रिणींनी खडसावले, स्वारगेटजवळील प्रकार