Pune Lonavala Railway Route | पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचा प्रश्न लवकरच मार्गी; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Murlidhar Mohol-Eknath Shinde

⁠राज्याचा वाट्यासंदर्भात मोहोळ यांची मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट

पुणे : Pune Lonavala Railway Route | मुंबई-पुणे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वाचा धागा असणाऱ्या पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा प्रश्न लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा करत या प्रकल्पातील राज्याच्या वाट्यासंदर्भात चर्चा केली. त्यावर राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली आहे.

गेली अनेक वर्षे मागणी असतानाही पुणे-लोणावळा रेल्वे मार्गिकेच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचा प्रश्न प्रलंबित असून केंद्र आणि राज्य सरकारच्या समान वाट्याचा मुद्दाही प्रलंबित होता. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने वाटा उचलावा, या संदर्भात मोहोळ यांनी भेट घेतल्यावर त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘राज्य सरकारने या प्रकल्पाच्या निम्म्या वाट्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली असून पुढील पाठपुरावा केंद्र सरकारकडे करणार आहे. या दोन्ही मार्गिकांचा प्रश्न मार्गी लागल्यावर पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक वेगाने होणार असून मालगाड्यांचा वेग वाढणार आहे. शिवाय मालगाड्यांची कोंडी टाळता येणार आहे’.

‘पुणे-लोणावळादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लोकलची संख्या वाढवता येणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
त्यामुळे प्रकल्पाचा वाढणारा खर्च आणि विलंब लक्षात घेता,
याचा पाठपुरावा करुन हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्म आहे’, असेही मोहोळ म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed