Pune Mayor Election | पुणे महापालिकेची महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक 9 फेब्रुवारीला
पुणे : Pune Mayor Election | पुणे महापालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या पदांसाठी ३ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
पुणे महापालिका निवडणूक नुकतेच पार पडली. १६५ सदस्य असलेल्या महापालिकेत सर्वाधिक ११९ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार आहे. महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे.
या सभेच्या पत्रिकेवरच स्थायी समिती साठी १६ सदस्यांची नियुक्ती, तसेच इतर विषय समित्यांवर १३ सदस्यांची नियुक्ती करण्याचा विषय देखील घेण्यात आला आहे.
दरम्यान , यंदा महापौर पद महिलांसाठी राखीव असल्याने उपमहापौर पदी शक्यतो पुरुष सदस्याला संधी दिली जाण्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे.
