Pune Mayor Elections | पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे,तर उपमहापौर पदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड (Video)
पुणे : Pune Mayor Elections | पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून वर्षा तापकीर, मानसी देशपांडे आणि मंजुषा नागपुरे या तीन महिला नगरसेवकांच्या नावाची चर्चा होती.अखेर भाजप कोअर कमिटीने मंजुषा नागपुरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकी मध्ये मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर या दोन्ही पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
यावेळी निवडणुक पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी काम पाहिले. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर,भाजप शहर अध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
