Pune Mayor Elections | काँग्रेस कडून महापौर पदासाठी अश्विनी लांडगे तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांना उमेदवारी
पुणे : Pune Mayor Elections | महापालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसने अश्विनी डॅनियल लांडगे तर उपमहापौरपदासाठी साहिल केदारी यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.
लांडगे या येरवडा प्रभागातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. तळागाळातील समाजासाठी काम करणाऱ्या नगरसेविका म्हणून परिचित आहेत. तर साहिल केदारी हे उच्च शिक्षित असून वानवडी प्रभागातून पहिल्यांदा विजयी झाले आहेत.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आम्ही महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याबाबत चर्चा करत होतो. परंतु त्यांनी उमेदवार देणार नसल्याचे सांगितले. निवडणूक प्रचारात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचा प्रचार करत होतो. आज महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस हा भाजपचा कायम विरोध करत असून आम्ही महापौरपदासाठी अश्विनी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांचा अर्ज दाखल केला आहे.
