Pune Mayor Elections | महापौर-उपमहापौर निवडीसाठी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना येरवडा जेलमधून बोलावणार

Pune Mayor Elections | Laxmi Andekar and Sonali Andekar to be summoned from Yerawada Jail for Mayor-Deputy Mayor election

पुणे : Pune Mayor Elections | महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौर निवड प्रक्रियेसाठी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना येरवडा कारागृहातून सभेसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण मुख्य सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी नगरसचिवांकडून कारागृह प्रशासनाला अधिकृत पत्र पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.

नऊ तारखेला पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होणार असून या दोन्ही नगरसेविकांना सभेला उपस्थित राहण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

You may have missed