Pune Mayor Elections | पुणे महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित

Pune Mayor Elections | Manjusha Nagpure's name confirmed for the post of Pune Mayor

पुणे : Pune Mayor Elections | महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती पुढे येत आहे. महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने आता केवळ औपचारिक प्रक्रिया बाकी आहे. सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळत आहे.

मंजूषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्या प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजयी झाल्या. पुणे महापालिकेची निवडणूक यावेळी मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली. वरिष्ठ नेत्यांमधील चर्चेनंतर महापौर आणि उपमहापौर पदांची निवडणूक बिनविरोध घेण्याचा निर्णय ठरवण्यात आला. त्यामुळे या पदांसाठी इतर उमेदवार उभे राहणार नाहीत.