Pune Mayor Elections | आज ठरणार पुणे शहराचा महापौर, उपमहापौर; भाजप अनुभवींना संधी देणार की धक्कातंत्र वापरणार !

Pune Mayor Elections | The Mayor and Deputy Mayor of Pune city will be decided today; Will BJP give a chance to experienced people or will it use shock tactics!

पुणे : Pune Mayor Elections |  पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी ९ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी मंगळवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांचाच महापौर व उपमहापौर होणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर कोण होणार ? एवढीच औपचारीकता बाकी आहे. भाजप अनुभवी नगरसेवकांना संधी देणार की धक्कातंत्राचा वापर करत नवीन चेहेर्‍याला संधी देणार हे अवघ्या काही तासांत समोर येणार आहे.

नुकतेच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने १६५ पैकी ११९ जागा जिंकत निर्विवाद सत्तेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पद निवडीची केवळ औपचारीकता आहे.  महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी चवथ्यांदा नगरसेवक झालेल्या वर्षा तापकीर, रंजना टिळेकर यांच्यासह तिसर्‍यांदा नगरसेविका झालेल्या  मंजुषा नागपूरे, स्मिता वस्ते आणि मानसी देशपांडे यांची नावे चर्चेत आहेत.  तर हडपसर मधून प्रतिनिधीत्व करणार्‍या उज्वला जंगले, मनीषा चोरबोले यांच्यासह प्रथमच महापालिकेत निवडूण आलेल्या माजी मंत्री दिवंगत गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांच्या नावाचाही विचार होउ शकतो. 

दुसरीकडे पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीत तीन महिलांना प्रत्येकी दहा महिने हे पद देण्याचा फॉर्म्युलाही ऐनवेळी वापरण्यात येउ शकतो, अशी शक्यता भाजपच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचा राज्यातील मित्र पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यायचा की नाही यावरून रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसकडून  या दोन्ही पदांसाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

You may have missed