Pune Metro News | पुणे मेट्रोचे काम 3 महिन्यात पूर्ण करण्याच्या पुणे पोलिसांच्या सूचना; वाहतूक कोंडीमुळे पोलीस यंत्रणेवर ताण

पुणे : Pune Metro News | शहरात ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्याने पुणेकरांना वाहतूककोंडीचा (Pune Traffic Issue) मोठा सामना करावा लागत आहे. या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पोलीस प्रशासनावरही ताण येत आहे. दरम्यान पोलीस प्रशासन (Pune Police) आणि पुणे मेट्रो प्रशासनाची यासंदर्भात एक बैठक बुधवार (दि.४) आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत पुणे मेट्रोचे काम ३ महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना पुणे पोलिसांनी दिल्या आहेत. यावेळी मेट्रो अधिकाऱ्यांसह, वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील (Manoj Patil IPS), पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (Amol Zende DCP) यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
मेट्रोकडून सुरु असलेल्या कामांची पूर्तता वेगाने करण्याची आवश्यकता असून त्यामुळे परिसरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. गणेशखिंड रस्त्यावर रेंजहिल्स कोपरा परिसरात शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिका खांबाच्या उभारणीसाठी २९ ऑगस्ट २०२३ पासून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात वाहतूककोंडी होत असून वाहन चालकांसह रहिवाशांना त्रास होत आहे. (Pune Metro News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक
Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या