Pune Metro News | पुणे मेट्रोमध्ये महिलांसाठी राखीव जागा; महिला दिनापासून नवा नियम लागू

Pune Metro News | Reserved seats for women in Pune Metro; New rule to come into effect from Women's Day

पुणे : Pune Metro News | पुणे मेट्रोने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त रविवार, ८ मार्च २०२६ पासून पुणे मेट्रोच्या सर्व ट्रेनमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागांची व्यवस्था लागू केली जाणार आहे.

या निर्णयामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासादरम्यान अधिक सुरक्षितता आणि सोय मिळणार असल्याचे पुणे मेट्रो प्रशासनाने सांगितले.

पुणे मेट्रोच्या प्रत्येक ट्रेनमधील तीनही कोचमध्ये ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये महिलांसाठी ४६ जागा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव जागा ओळखण्यासाठी कोचमध्ये विशेष चिन्हे (साइनेज) लावण्यात आली असून, प्रवाशांनी त्या सूचनांनुसारच आसनव्यवस्था वापरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या नव्या व्यवस्थेचा सविस्तर आराखडा (ड्रॉइंग लेआउट) पुणे मेट्रोच्या सर्व स्थानकांवर तसेच अधिकृत मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना राखीव जागांच्या नियमांचे पालन करण्याचे आणि सहप्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या सुरक्षित प्रवासाला चालना मिळणार असून, मेट्रो प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि समावेशक होणार आहे.

You may have missed