Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Rain

पुणे : Pune Monsoon Rain | मागील दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे घाटमाथ्यासह शहरातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शनिवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये शिवाजीनगर येथे ३७ मिलिमीटर पाऊस पडला होता. सर्वाधिक पाऊस लोणावळा येथे २४१.५ मिमी कोसळला. शहरातील एनडीए भागात ५६.५ आणि पाषाणमध्ये ३८.५ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी पहाटेपासून सरींवर सरी पडत होत्या. शिवाजीनगर येथे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १६.६ मिमी पाऊस नोंदला गेला. (Pune Monsoon Rain)

जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही भागात सोमवार (ता. १५) आणि मंगळवारी (ता. १६) अतिमुसळधार पावसाच्या सरी पडणार आहेत.
तसेच, सपाट भागावर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडणार असल्याने हवामान खात्याने पुणे जिल्ह्याला दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. खडकवासला धरणात २ जुलैला ४.५५ टीएमसी पाणीसाठा होता.
रविवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तो १०.१२ टीएमसीपर्यंत वाढला असल्याची माहिती मिळाली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड