Pune MPSC Student Missing | मंत्रालयात नोकरी लागल्याचं सांगून घराबाहेर पडला; पुण्यात एमपीएससी करणारा तरुण तीन महिन्यांपासून ‘गायब’

Pune MPSC Student Missing

पुणे : Pune MPSC Student Missing | पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयामध्ये नोकरी लागल्याचे पालकांना खोटे सांगून हा तरुण बेपत्ता झाला आहे. बुद्धभूषण पठारे (Budhbhushan Pathare) असं या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) बुद्धभूषणच्या आई-वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धभूषण पठारे मूळचा छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील आहे. गेल्या चार वर्षांपासून तो पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. पुण्यातील गांजवे चौक परिसरातील एका इमारतीत तो आपल्या मित्रांसोबत रहात होता. तसेच नवी पेठेतील अभ्यासिकेत तो अभ्यास करायचा.

अचानक मे महिन्यात त्याने आपल्या आई-वडिलांना मंत्रालयात नोकरी मिळाली असल्याचे सांगितले. मुलाला नोकरी लागल्याचे ऐकून आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला. मुलाला शुभेच्छा देण्यासाठी आणि भेटण्यासाठी त्याच्या पालकांनी मुंबई गाठली मात्र तिथे त्यांना आपला मुलगाच भेटला नाही. त्याचा मोबाईल बंद लागला यानंतर त्याच्या वडिलांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. (Pune MPSC Student Missing)

काही दिवसांपूर्वी मात्र अचानक त्याच्या मोबाईलवरून त्याच्या पालकांना एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करण्यात आला होता.
ज्यामध्ये मी सध्या डिप्रेशनमध्ये आहे, असा उल्लेख केला आहे. यामुळे बुद्धभूषण पठारे नेमका गेला कुठे?,
कोणाच्या संपर्कात तो आहे का? त्याचे कोणाशी काही वाद झाले का? याच बरोबर त्याच्याशी कोणी आर्थिक व्यवहार केले का?
असा संशय पोलिसांना आहे. पोलिस या सर्व बाजूने तपास करत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान

Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी

Ajit Pawar NCP Baramati | ‘येत्या 8 दिवसात पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या’; अजित पवारांचा आदेश; खांदेपालट होण्याचे संकेत

Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून

You may have missed