Pune Nagar Highway News | पुणे महामार्गावरील टोलनाक्यावर तब्बल 23 कोटींचे सोने जप्त, प्रचंड खळबळ

अहिल्यानगर: Pune Nagar Highway News | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करून निवडणुका स्वच्छ, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी आचारसंहितेचे कठोर पालन करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ठिकठिकाणी महामार्गांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. (Supa toll Plaza)
नगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर काल (दि.३१) एका चारचाकी वाहनातून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. दागिने आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली, तेव्हा ४ कोटी रुपयांचे दागिने असल्याचे आढळून आले.
प्रत्यक्षात दागिन्यांचे वजन करण्यात आल्यानंतर ते दागिने २३ कोटी ७१ लाख रुपयाचे आहे. हे दागिने संभाजीनगरमधील एका सराफ व्यावसायिकाचे आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी, तपासणी पथक व सुपा पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. ही गाडी पुण्यावरुन अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे जात असल्याचे गाडीतील व्यक्तींनी सांगितले.
या गाडीमध्ये तीन व्यक्ती होत्या. सुरूवातीला त्यांच्या जवळील बिलावरुन गाडीमध्ये
४ कोटी ९७ लाख रुपयांचे सोने व चांदीचे दागिने असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर निवडणूक अधिकारी, सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड,
आयकर अधिकारी यांनी पंचांसमक्ष पंचनामा केला. तेव्हा गाडीमध्ये जास्तीचे बिले व सोने आढळून आले.
यामुळे पोलीस, आयकर व निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखीखाली मोजमाप केले.
त्यात सोन्याचे तयार दागिने, सोन्याची बिस्किटे, चांदीच्या विटा व डायमंड आढळून आले.
गाडीसोबत दाखवलेली बिले व प्रत्यक्ष असलेला माल यात मोठी तफावत आढळून आली.
त्यामुळे व्यावसायिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा