Pune Nagar Road Accident News | पीएमपी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यु ! नगर रोडवरील टाटा गार्डरुम चौकात अपघात

Nashik Accident News | Early morning havoc on Malegaon-Manmad Road: Four killed, more than 20 injured in horrific travel-pickup accident

पुणे : Pune Nagar Road Accident News | नगर रस्त्यावरुन पीएमपी बस वडगाव शेरीकडे वळत असताना खराडीकडून आलेल्या मोटारसायकलस्वाराला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यु झाला.

अशोक देवबहादूर घर्ती (वय ३२, रा. आनंद पार्क वडगाव शेरी, मुळ रा. नेपाळ) असे मृत्यु पावलेल्या दुचाकीवरील तरुणाचे नाव आहे.
याबाबत गोपाल देवबहादूर घर्ती (वय ३३, रा. आनंद पार्क, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बसचालक रवींद्र गेनबा गायकवाड (वय ४०, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात नगर रोडवरील टाटा गार्डरुम चौकात बुधवारी पहाटे ६ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी बस पुण्याकडून वडगाव शेरीकडे चालली होती. टाटा गार्डन चौकात बस उजवीकडे वडगाव शेरीकडे वळत होती. त्याचवेळी खराडीकडून अशोक घर्ती हे दुचाकीवरुन पुण्याकडे जात होते. बसने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. दुचाकीवरील घर्ती हे दुचाकीसह बसखाली अडकले.
जखमी अवस्थेत त्यांना ससून रुगणालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टर तपासणीपूर्वी त्यांचा मृत्यु झाला.
सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन

You may have missed