Pune News | 5 कोटी खर्च करून तब्बल 100 शववाहिका खरेदी केल्या, मात्र तीन महिन्यांपासून धुळखात पडल्या; अखेर प्रशासनाला जाग; शववाहिन्यांचे वाटप सुरू

पुणे : Pune News | माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात ३५ कोटी खर्च करून तब्बल १०० शववाहिका खरेदी करण्यात आल्या होत्या. तब्बल ३५ कोटींच्या या शववाहिका तीन महिन्यांपासून अधिक काळ लोटला तरी वाटप न करता धुळखात पडल्या होत्या. दरम्यान आता प्रशासनाने या शववाहिकांचे वाटप सुरु केले आहे.
या १०० शववाहिकांपैकी नागपूरला ५ गाड्या, वाशिम-३, १६ दुर्गम आदिवासी जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ४ गाड्या, तसेच १८ इतर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी २ गाड्या देण्यात येणार आहेत. तीन महिन्यांहून अधिक काळ या गाड्या डॉ. नायडू रुग्णालयाजवळ मोकळ्या जागेत उभ्या होत्या. त्यामुळे काही गाड्यांच्या चाकातील हवा गेलेली तर काहींच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या होत्या. तब्बल ३५ कोटींच्या खरेदीमागे काही काळंबेरं आहे का? असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर आता प्रशासनाने या गाड्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.