Pune News | सायरन वाजवत गाडी चालवणाऱ्या आमदाराला पुणेकरानं सुनावलं; प्रश्नांचा भडीमार; व्हिडिओ व्हायरल

Kishore Darade

पुणे : शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Eknath Shinde) आमदार गाडीचा सायरन वाजवत प्रवास करत असताना पुणेकर नागरिकाने त्यांना थांबवून हटकले आणि प्रश्नांचा भडीमार केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.

तर झालं असं की शिवसेना आमदार किशोर दराडे (Kishore Darade) यांची गाडी बाजीराव रोडवरून (Bajirao Road Pune) जात असताना त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरने सायरन वाजवत गाडी चालवली होती. दरम्यान सायरन का वाजत आहे हे एका सुज्ञ पुणेकराने पाहिले तेव्हा गाडीत त्यांना आमदार किशोर दराडे असल्याचे दिसले. त्यानंतर पुणेकराने गाडीची काच खाली घ्यायला लावली आणि त्यांना चांगलंच झापलं.

पुणेकराने ड्रायव्हरला शीट बेल्ट का लावला नाही असा जाब विचारला. यावेळी आमदार दराडे पुणेकराकडे पाहात राहिले. आम्ही जनता आहे आम्ही निवडून देतो तेव्हाच ते आमदार होतात. पोलिसांकडे पाहू नको असेही या पुणेकराने चालकाला सुनावले. आमदार दराडे हा सर्व प्रकार पाहात होते. (Pune News)

पुणेकर आमदाराला खडेबोल सुनावत असताना ते शांत होते. त्यांची चूक असल्यामुळेच आमदार काही बोलू शकले नाहीत.
आमदार दराडे नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

You may have missed