Pune News | विद्यार्थी, कष्टकऱ्यांसाठी ‘देवपुष्प किचन’चे डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : Pune News | देवपुष्प समाज विकास प्रतिष्ठान संचलित विद्यार्थी,कष्टकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘देवपुष्प किचन’ चे उदघाटन दि. ३१ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते झाले.हा कार्यक्रम निंबाळकर सायकल मार्ट समोर,सदाशिव पेठ येथे सायंकाळी ५.३० वाजता झाला.आठवड्याचे सर्व दिवस विद्यार्थी,मध्यम वर्ग आणि कष्टकऱ्यांसाठी माफक दरात सात्विक जेवण येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रत्नमाला दीपक मोहिते, दीपक मोहिते, विनोद मोहिते, प्रमोद मोहिते यांनी स्वागत केले. स्ट्रीट व्हेंडिंग कमिटीच्या राज्यातील पहिल्या सदस्या भीमाबाई लाडके यांना थाळी देवून उद्घाटन करण्यात आले. संजय कानडे,संदीप बर्वे, नीलम पंडित, एड.स्वप्नील तोंडे , सचिन शेंडगे , निहाल सातपुते आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.