Pune News | गटई कामगारांना पत्र्याच्या स्टॉल वाटप योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : Pune News | चर्मकार व्यवसाय करणाऱ्या गटई कामगारांना पत्र्याच्या स्टॉल वाटप योजनेकरीता जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सामाजिक न्याय व विशेष विभागामार्फत अनुसूचित जाती घटकातील चर्मकार समाजासाठी गटई काम (चमड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्ती) करण्याकरीता रस्त्याच्या कडेला ऊन व पावसापासून संरक्षण होण्यासाठी १०० टक्के अनुदानतत्वावर स्टॉल देण्यात येतो.
योजनेचा लाभ घेण्याकरीता चर्मकार समाजातील १८ ते ६० वयोगटातील नागरिक पात्र आहेत. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न नागरी भागासाठी ५० हजारापेक्षा कमी तर ग्रामीण भागासाठी ४० हजारापेक्षा कमी असल्याबाबत उत्पन्नाचा दाखला, अनुसूचित जातीचा दाखला, अर्जदाराकडे स्टॉल ठेवण्यासाठी स्वतःची जागा असावी, स्वतःची जागा नसल्यास जागेबाबत नगर परिषद किंवा महानगरपालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि स्टॉलची विक्री करणार नसल्याबाबतचे हमीपत्र अर्जासोबत जोडावे.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन,
सर्वे क्र. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या समोर, येरवडा, पुणे-०६ (दूरध्वनी-०२०-२९७०६६११)
येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता