Pune News | लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर यांचा पुण्यात निषेध
पुणे : Pune News | ई.व्ही.एम मशिन घोटाळा (EVM Scam) मुद्यावरून लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर करीत बेलगाम टीकेचा निषेध करण्याकरिता महाविकास आघाडी, धनगर (ओ.बी.सी.) समाजातर्फे पुण्यातील कात्रज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.१ डिसेंबर रोजी सायंकाळी हे आंदोलन देवेंद्र धायगुडे -पाटील (पुणे जिल्हा उपाध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. (Pune News)
यावेळी ई.व्हि.एम मशिन घोटाळा च्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. लक्ष्मण हाके,गोपिचंद पडळकर हे समाजाची फसवणुक करीत असून ते ज्येष्ठ नेते शरद पवार- खासदार सुप्रीया सुळे यांच्या वैयक्तिक गोष्टींवर टीका करीत आहेत. ही टीका थांबली पाहिजे,अशी मागणी करण्यात आली. पडळकर व लक्ष्मण हाके समाजाचे नाव पुढे करून स्वताची पोळी भाजुन घेत आहेत.मंत्री पदासाठी हे लाचार नेते समाजाची घोर फसवणूक करीत आहेत.
या दोन्ही मुद्यावर महाविकास आघाडी (ओ.बी.सी.) धनगर समाजाचे वतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन
करीत आहोत,असे देवेंद्र धायगुडे यांनी सांगितले. किरण शिंदे (शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष )
अभिषेक साठे, शिवाजी हिरवे, प्रविण धायगुडे, अनिल गवळी, बलराम शिळीमकर, आकाश धायगुडे,
संदेश ठोंबरे ,राजु ढेबे, राहुल धायगुडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी