Pune News | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन

पुणे: Pune News | केंद्र सरकारने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन गौरविण्यात यावे यासाठी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती युवा मोर्चा कसबा विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने अध्यक्ष रोहित आल्हाट यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना आज (दि.१९) निवेदन दिले. यावेळी मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून पक्षाचीही ही भूमिका असल्याचे सांगत आपण या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. (Pune News)
साहित्यरत्न डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन गौरविण्यात यावे यासाठी कसबा विधानसभा मतदार संघ निवडणूक प्रमुख हेमंत रासने, कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, कसबा विधानसभा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष माधव साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांना दिले असल्याचे आल्हाट यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अश्रू खवळे, पवन खवळे, चेतन मोरे उपस्थित होते.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य