Pune News | पर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय ‘टुरिस्ट गाईड ट्रेनिंग’

Pune News | Seven-day ‘Tourist Guide Training’ by Directorate of Tourism

पुणे : Pune News |  पर्यटन संचालनालयामार्फत ‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत पुणे प्रादेशिक विभागातील इच्छुक युवक-युवतींसाठी टुरिस्ट गाईड ट्रेनिंग हे सात दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पर्यटन स्थळांवर मार्गदर्शन, आदरातिथ्य सेवा तसेच पर्यटनाशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि १८ ते ४५ वयोगटातील सुमारे २०० युवक-युवतींना या प्रशिक्षणाची संधी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये ग्वाल्हेर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सिंहस्थ कालावधीत टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.

इच्छुकांनी दि. २० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत गुगल फॉर्मद्वारे अर्ज करावा. निवड प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक :
https://docs.google.com/forms/d/e/RFAIpQLScbn°rmXID८०R@hfCD_ZdxPyHbLDcUeAynPwPWHs4RgVKG४Q/viewform⁠�

अधिक माहितीसाठी प्रादेशिक पर्यटन कार्यालय, पुणे (दूरध्वनी : ८०८००३५१३४) येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालक भरत लांघी यांनी केले आहे.

You may have missed