Pune News | धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र तुळापूर येथे विविध कार्यक्रम

Tulapur

वाघोली : (सचिन धुमाळ) – Pune News | पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती व श्रीक्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त येत्या शनिवारी (ता. २९) श्रीक्षेत्र तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजांची शासकीय पूजा व मानवंदनेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री नितेश राणे, मा.जयंत पाटील, तसेच खासदार उदयनराजे भोसले, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार ज्ञानेश्वर कटके, जिल्हा बँक संचालक प्रदिपदादा कंद, रोहिदास शेठ उंद्रे, चेअरमन सुभाष आप्पा जगताप,संदीपआप्पा भोंडवे, रवींद्र कंद आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

  कार्यक्रमाबाबत तुळापूर ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानुसार सकाळी आठ वाजता मुख्य पदयात्रा, नऊ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा, अकरा वाजता शासकीय पूजा व पोलीस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना, साडेअकरा वाजता धर्मवीर शंभूराजे पालखीचे आगमन व स्वागत, दरम्यानच्या काळात शाहिरी कार्यक्रम पोवाडे व शिवव्याख्यान असे कार्यक्रम होणार आहेत.

   दुपारी बारा वाजता समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

येणाऱ्या शंभू भक्तांसाठी तुळापूर ग्रामपंचायत व शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अन्नप्रसाद, दर्शन व्यवस्था व पार्किंगबाबत लोणी त्यांचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी नियोजन केले आहे. तसेच प्रांताधिकारी यशवंत माने, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते व गटविकास अधिकारी भूषण जोशी, यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.

  यावेळी सरपंच ॲड.गुंफा इंगळे, माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले, माजी सरपंच रुपेश शिवले, माजी उपसरपंच नवनाथ शिवले, शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिवले, उपाध्यक्ष संजय बंडू शिवले,सचिव अमोल शिवले,संचालक हनुमंत शिवले, विजय शिवले व समस्त ग्रामस्थ तुळापूर  उपस्थित होते.

You may have missed