Pune News | एक्साईड बॅटरी कंपनीकडून कामगारांचे शोषण? अंतर्गत युनियन साठी दबाव टाकल्याचा आरोप, कामगारांचे आंदोलन

पिंपरी : Pune News | कामगारांनी बाहेरील संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले म्हणून चिंचवड येथील एक्साईड बॅटरी कंपनी कामगारांचे शोषण करत असून अंतर्गत युनियन साठी दबाव टाकल्याचा आरोप करत कंपनीच्या दारातच कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. आज (दि.२२) या कामगारांच्या आंदोलनाचा ९५ दिवसाचा कालावधी लोटला परंतु अजूनही व्यवस्थापन व युनियन यांच्याकडून कोणतीही दाखल घेण्यात आलेली नाही.
दरम्यान आज परमनंट नोकरीत असलेल्या कामगारांनी मुंडन आदोलन केले. या कामगारांना मागील दोन वर्षात एक रुपयाही मिळालेला नाही. या विषयाला घेऊन कामगारांनी हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला उज्वला गौड यांनी पाठिंबा दिला आहे.