Pune Parking Updates | हांडेवाडी, कोंढवा वाहतूक विभागातर्गत पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल
पुणे : Pune Parking Updates | वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील हांडेवाडी व कोंढवा वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.
हांडेवाडी वाहतूक विभागांतर्गत (Handewadi Traffic Division) श्रीराम चौकाच्या २० मी. पुढे ८० मी. रुणवाल सेहगल सोसायटी व संस्कृती सोसायटीचे अलीकडे असलेल्या गतीरोधकापर्यंत रोडच्या डाव्याबाजूस ८० मी. पी-१ आणि रोडच्या उजव्याबाजूस ८० मी. पी-२ तसेच न्याती इस्टेट सोसायटी ते दिल्ली पब्लिक शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत रोडच्या डाव्याबाजूस १५० मी. पी-१ व रोडच्या उजव्या बाजूस १५० मी. पी-२ पार्किंग करण्यात येत आहे. (Pune Parking Updates)
कोंढवा वाहतूक विभागातर्गत (Kondhwa Traffic Division) ट्रिबेका हायस्ट्रीट सोसायटीमधील क्रोमा टाटा एन्टरप्रायझेस ते ट्रिबेका हायस्ट्रीट सोसायटी मुख्य प्रवेशद्वारापर्यंत (८० मिटर) चारचाकी वाहनाकरीता पार्किंग तर ट्रिबेका हायस्ट्रीट सोसायटी मुख्य प्रवेशद्वार ते द आर्क प्रवेशद्वारापर्यंत (११५ मिटर) नो-पार्किंग करण्यात येत आहे.
पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व
हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड,
पुणे यांच्या कार्यालयात १० ऑगस्ट पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात.
नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील,
असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांनी कळविले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु