Pune Pimpri Chinchwad Crime News | 10 वर्षाच्या मुलीला अश्लिल व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार

Molestation

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अश्लिल व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार करणार्‍या नराधमाला वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) अटक केली आहे.

अनिरुद्ध सदाशिव डबीर Anirudh Sadashiv Dabir (वय ४२, रा. अनमोल रेसिडेन्सी, अ‍ॅम्बीयंस हॉटेल, वाकड) असे या नराधमाचे नाव आहे. याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ जून २०२० ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १० वर्षाची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना या नराधमाने तिचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला अश्लिल व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) करेल, असे बोलला. त्यावर मुलीने घाबरुन नकार दिल्यावर पुढच्या वेळेस अत्याचार करेल, असे बोलून ”तू जर तुझ्या घरी सांगितले, तर मी तुला व तुझ्या भावाला मारेल,” अशी धमकी दिली. हा प्रकार या मुलीने आता आईला सांगितल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed