Pune Pimpri Chinchwad Crime News | गावठी पिस्तुल बाळगणार्‍या तिघांना पकडून 3 पिस्तुल व 5 काडतुसे जप्त; एका अल्पवयीन मुलाचा समावेश

pistol

पिंपरी: Pune Pimpri Chinchwad Crime News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने सुरु असलेल्या नाकाबंदी तसेच गुन्हेगाराच्या तपासणीमध्ये अनेक गुन्हेगार पोलिसांच्या हाताशी लागत आहेत. बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणार्‍या तिघांकडून पोलिसांनी तीन पिस्तुले व पाच काडतुसे जप्त केली. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. (Pistol Seized)

प्रशिल संतोष डोंगरे (वय २०, रा. बौद्धनगर, भाटनगर, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार रोहित रघुनाथ वाघमारे यांनी पिंपरी पोलिसांकडे (Pimpri Police) फिर्याद दिली आहे. पिंपरी येथील व्हिसडम पार्क सोसायटीच्या समोरील रोडवर प्रशिल डोंगरे हा थांबला होता. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे आढळून आली. सहायक पोलीस निरीक्षक अतिग्रे तपास करीत आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने एका अल्पवयीन मुलाकडून एका गावठी रिव्हॉल्व्हर व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. देहुरोड येथील साई चौकातील बिरंगल जिमच्या समोर हा अल्पवयीन मुलगा शनिवारी रात्री साडेदहा वाजता थांबला होता. पोलिसांनी संशयावरुन त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर व काडतुस आढळून आले.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी (Talegaon MIDC Police Station) कुणाल गणपत जगताप (वय २३, रा. वडगाव) या गुंडाकडून देशी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे मॅगझीन असलेले पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मावळ तालुक्यातील बधलवाडी ते मिढेवाडी कडे जाणार्‍या रोडवर कुणाल जगताप हा रविवारी सायंकाळी संशयास्पदरित्या थांबलेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलीस हवालदार शेख पुढील तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baramati Assembly Election 2024 | ‘बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील’, युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे त्यानुसार…’

Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार

Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा

You may have missed