Pune Pimpri Chinchwad Crime News | गुंतवणुकीवर जादा परतावाचे आमिष दाखवून 38 लाखांची फसवणूक, पैसे मागायला गेल्यावर इज्जत लुटण्याची दिली धमकी

Fraud

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | ट्रॅव्हल बस व्यवसायात गुंतवणुक केल्यास दर महा ३ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून २ बस घेण्यासाठी ३८ लाख रुपये घेऊन कोणताच परतावा दिला नाही (Cheating Fraud Case). तेव्हा फिर्यादी महिला पैसे मागण्यासाठी गेल्या असताना त्यांना अंगावर ३ -४ मुले सोडून इज्जत लुटण्यास लावतो, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजय नारायण पवार Sanjay Narayan Pawar (वय ४५) आणि सागर संजय पवार Sagar Sanjay Pawar (वय २२, दोघे रा. सूर्या पार्क, चिखली प्राधिकरण) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १९ नोव्हेबर २०२३ पासून ९ नोव्हेबर २०२४ पर्यंत निगडी येथील सावली हॉटेल व आकुर्डी येथील दत्तवाडी तसेच भोसरीतील स्पाईन रोडवरील कोच गॅरेज येथे घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन ट्रॅव्हल्सचे मालक संजय पवार याने फिर्यादीचा विश्वास संपादन करुन त्यांना दोन ट्रॅव्हल बसचे व्यवसायामध्ये महिन्याला ३ लाख रुपये देतो, असे सांगितले. दोन ट्रॅव्हल्सकरीता त्यांच्याकडून २३ लाख ४० हजार रुपये ऑनलाईन व १४ लाख ६० हजार रुपये रोख असे ३८ लाख रुपये घेतले. त्याबदल्यात नवीन ट्रॅव्हल बसचे फोटो दाखवले. प्रत्यक्षात जुन्या ट्रॅव्हल बस दाखविले. त्यामुळे फिर्यादी यांनी वेळोवेळी गाड्यांबाबात विचारणा केली. ३८ लाख रुपये घेतल्यानंतरही कोणत्याही गाड्या फिर्यादीचे नावावर केल्या नाहीत. फिर्यादींची आर्थिक फसवणूक केली.

फिर्यादी या १६ मार्च २०२४ रोजी पैसे मागण्यासाठी संजय पवार याच्या भोसरीतील स्पाईन रोडवरील रॉयल कोच गॅरेज येथे गेल्या.
तेथे पवन ट्रॅव्हल्स व साई कृपा ट्रॅव्हल्सचे मालक संजय पवार व सागर पवार यांनी फिर्यादीला वाईट वाईट शिवीगाळ केली.
अपशब्द वापरुन फिर्यादीचे अंगावर ३ ते ४ पोर सोडून इज्जत लुटण्यास लावतो,
असे म्हणून फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच बसचे बाहेर पडत असताना सागर पवार
याने फिर्यादीला पाठीमागून हात लावून जोरजोरात हसून परत पैसे मागायला येऊ नकोस, नाही तर आम्ही जे बोललो आहे,
ते करुन दाखवु असे बोलून त्यांचा विनयभंग केला. पोलीस निरीक्षक शेख तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली;
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे प्रतिपादन

Hadapsar Assembly Election 2024 | महाराष्ट्राची अधोगती करणाऱ्यांना घरी बसवायचेय; जयंत पाटील यांचे प्रतिपादन (Video)

Bibvewadi Pune Crime News | चार महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात

You may have missed