Pune Pimpri Chinchwad Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्याकडून सव्वा लाखांचा गांजा हस्तगत

Arrest

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथक वाकड परिसरात गस्त घालत असताना संशयास्पदरित्या थांबून ग्राहकांची वाट पहात असलेल्या तरुणाला पकडून त्याच्याकडील सव्वा लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

राजेंद्र अभिमान जाधव (वय ३०, रा. काळुबाई मंदिराशेजारी, केसनंद, मुळ रा. राळेसांगवी, ता. भुम, जि. उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे. (Pimpri Crime Branch)

याबाबत पोलीस हवालदार मोहम्मदगौस रफिक नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप सावंत, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, पोलीस अंमलदार शिंदे, चव्हाण, प्रशांत सैद व फिर्यादी हे अंमली पदार्थाच्या धंद्याची माहिती काढण्यासाठी वाकड परिसरात गस्त घालत होते. वाकड येथील कावेरीनगर भाजी मंडईजवळ पिंक सिटी रोडला एक जण होंडा शाईन गाडीवर हातात पांढर्‍या रंगाच्या प्लास्टिकची पिशवीसह उभा होता. त्याच्या पिशवीत काहीतरी संशयास्पद असल्याची शंका आल्याने पोलिसांनी त्याला पकडले. पिशवीची झडती घेतली असता त्यात प्लास्टिकच्या छोट्या पुड्या, सुट्टा गांजा मिळून आला. त्याच्याकडून १ लाख २६ हजार रुपंयाचा १२८६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस ठाण्यात त्याच्यावर एन डी पी एस अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव (PSI Atul Jadhav) तपास करीत आहेत. (Ganja Selling Case)

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती

Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्‍या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’

You may have missed