Pune Pimpri Chinchwad Crime News | मतदान करतानाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकणार्‍या तरुणास अटक

Pune Crime News | Married woman commits suicide by hanging herself due to harassment by in-laws over suspicion of character; Bharati Vidyapeeth police arrest four

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | बेकायदेशीरपणे मोबाईल मतदान केंद्रात घेऊन जाऊन मतदान करतानाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकणार्‍या तरुणास सांगवी पोलिसांनी (Sangvi Police) अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

मार्टिन जयराज स्वामी Martin Jayaraj Swami (वय २५, रा. संध्यानगरी सोसायटी, पिंपळे निलख) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत निवडणुक मतदान केंद्राधिकारी नरेंद्र देशमुख (वय ५४, रा. भांगरवाडी, लोणावळा) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पिंपळे निलख येथील विद्या विनयनिकेतन शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४७४ या मतदान बुथवर बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मतदान बुथवर प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून कर्तव्य करीत होते. यावेळी आरोपीने स्वत:चे मतदान करताना, बॅलेट युनिट व व्ही व्ही पी ए टी यांचे फोटो काढल्याचे व बॅलेट युनिटवरील अं. क्रमांक १ वरील तुतारी वाजविणारा माणूस या निशाणीवर बटण दाबून मत टाकल्याचा व तशी स्लिप व्ही व्ही पॅटमध्ये दिसून आली. हा फोटो व व्हिडिओ त्याने स्वत:चे इन्स्टाग्राम अकाऊंट वर स्टोरी ठेवून प्रसारित केले.

हे करताना त्यान मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केला व निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक चेवले तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Pune Crime News | मतदानासाठी रस्त्यावर उतरलेले लोक, कडक पोलीस बंदोबस्तामुळे गुन्हेगारी ‘निरंक’ ! किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत तर गुन्ह्यांमध्येही मोठी घट

You may have missed