Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीच्या अंगावर चिठ्ठी फेकल्यावरुन वादातून मारहाण, एकाचा मृत्यु ! पाच जणांना अटक, महाळुंगे येथील लॉजवरील घटना

Murder

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | हॉटेलमध्ये जेवण करुन बील देताना एकाने पत्नीच्या अंगावर कागदाची चिठ्ठी फेकल्याने वाद झाला. त्यावरुन हॉटेलच्या मालकाने साई अमृत लॉज येथे बोलावून घेतले. तेथे बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यु झाला़ पोलिसांनी खूनाचा (Murder Case) गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे.

संकेत गावडे (रा. कमलपार्क सोसायटी, थिगळे वस्ती, निघोज ता. खेड) असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दीपक मधुकर जाधव (वय २५, रा. दिघी, समर्थनगर), दीपक सुभाष सोनवणे (वय२६, रा. साई अमृत हॉटेल, महांळुगे), तेजस सोपान गाढवे (वय २६, रा. प्रियंका सोसायटी, मोशी), अक्षय मारुती पाटील (वय २७, रा. चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बंटी आणि गोल्या अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जयदीप हॉटेल व महांळुगे येथील साई अमृत हॉटेल येथे १९ ऑगस्ट रात्री पावणे आठ ते २० ऑगस्ट पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला. (Arrest In Murder Case)

याबाबत चैत्राली संकेत गावडे (वय २३, रा. कमलपार्क सोसायटी, थिगळे वस्ती, निघोज, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्याचे पती संकेत गावडे व मुलांसह जेवणाकरीता जयदीप हॉटेलमध्ये गेले होते. संकेत गावडे हे बील भरत असताना दीपक सोनवणे याने फिर्यादीच्या अंगावर कागदाची चिठ्ठी फेकली, ते पतीने पाहिल्यावर त्या चिठ्ठीवरुन वाद झाला. तेव्हा सोनवणे याने संकेत याच्या कनपटीत चापट लगावली. त्या कारणावरुन हॉटेलचे मालक यांनी संकेत यांना फोन करुन मी साई अमृत लॉज चामेन शेठ बोलतो. तुमचा काय विषय झाला आहे. तो मिटवू, तु साई अमृत लॉज महाळुंगे येथे ये असे बोलल्याने फिर्यादी, संकेत व मुले लॉजवर गेले.
तेथे झालेल्या वादात पाच जणांनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्याने बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली.
फिर्यादी पतीला सोडविण्यासाठी गेल्या असताना त्यांच्या कानपटीत चापट मारली. संकेत गावडे यांना हॉस्पिटलमध्ये नेले.
उपचार सुरु असताना पहाटे त्यांचा मृत्यु झाला. अंत्यसंस्कार केल्यानंतर काल फिर्याद दिली.
पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना