Pune Pimpri Chinchwad Crime News | उसने दिलेले पैसे परत मागितल्याने तरुणीला दिला मानसिक त्रास ! तिने उचलले टोकाचे पाऊल

Suicide

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | उसने दिलेले पैसे परत मागितल्याने त्याने तरुणीला मानसिक त्रास दिला. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली.

पायल मच्छिंद्र कोकाटे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तिची आई नंदा मच्छिंद्र कोकाटे (वय ४८, रा. बोतार्डे, ता. जुन्नर)यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राम कोकाणे (रा. अजनावळे, ता. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोशीमधील आदर्शनगर (Adarsh Nagar Moshi) येथे ३१ जुलै रोजी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल ही शिक्षणासाठी मोशीतील आदर्शनगर येथे रुम घेऊन रहात होती. तिने राम कोकणे याला उसने पैसे दिले होते. ते पैसे पायल त्याला परत मागत होती. पैसे देण्यास तो टाळाटाळ करुन तिला मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तिने रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक खताळ अधिक तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान

Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी

Ajit Pawar NCP Baramati | ‘येत्या 8 दिवसात पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या’; अजित पवारांचा आदेश; खांदेपालट होण्याचे संकेत

Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून

Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर

You may have missed