Pune Pimpri Chinchwad Crime News | ग्राहकाच्या शोधात असलेल्या गुंडाकडून 3 पिस्तुले, 3 काडतुसे हस्तगत

pistol

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | स्वतःला भाई समजणाऱ्याने पिस्तूल आणून विक्रीसाठी ग्राहकाचा शोध सुरु केला. त्याचा हा शोध पोलिसांपाशी येऊन थांबला. पोलिसांनी त्याला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून ३ पिस्तुले व ३ काडतुसे जप्त केली आहेत. (Pistol Seized)

आदित्य महेश डोंगरे (वय २४, रा. समर्थनगर, नवी सांगवी) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार विवेक रमेश गायकवाड (वय ३२) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे.

आदित्य डोंगर हा नवी सांगवी परिसरात भाईगिरी करायला लागला होता. आपले वर्चस्व दाखविण्यासाठी त्याने ३ पिस्तुले आणली होती. त्यांच्या विक्रीसाठी तो ग्राहक शोधत होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. आदित्य डोंगरे हा जुनी सांगवीतील दत्त आश्रम रोडवरील दापोडीकडे जाणार्‍या नविन पुलाच्या बांधकामाच्या खाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. त्याच्याकडून मॅगझिन असलेले देशी बनावटीचे ३ पिस्तुले व ३ काडतुसे असा ७६ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ताकभाते अधिक तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed