Pune Pimpri Chinchwad Crime News | चरस, मेफेड्रॉन बाळगणार्यास अटक ! चार लाखांचे अंमली पदार्थ केले जप्त

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | भोसरी येथे चरस व मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ बाळगून विक्री करणार्यासाठी आलेल्यास गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे.
जहीर कदीर खान (वय २६, रा. जामा मस्जिद शेजारी, भाग्योदयनगर, कोंढवा मुळ रा. असेफिया कॉलनी, संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस हवालदार महादेव गजेंद्र जावळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpri Chinchwad Crime Branch)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्ताने गुन्हे शाखेचे युनिट १ चे पथक सोमवारी रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Police Record) चेक करीत होते. त्यावेळी त्यांना देवकर वस्ती येथे एक संशयितरित्या थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस बनाचावडी ते चक्रपाणी वसाहतीकडे जाणार्या रोडवर तपासणी करत होते. त्यावेळी जहीर खान पोलिसांना पाहून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडून झडती घेतली. त्याच्याकडे १३ ग्रॅम मेफेड्रॉन (एम डी) आणि ९ ग्रॅम चरस व २ मोबाईल मिळून आले. पोलिसांनी ४ लाख ९ हजार २५० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा