Pune Pimpri Chinchwad Crime News | मध्यरात्री हॉर्न वाजवत जाणार्‍यास थांबविल्याने महाविद्यालयीन तरुणाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करुन धरली गणवेशाची कॉलर

traffic police

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मोटारसायकल रेस करत मोठमोठ्याने हॉर्न वाजवत जाणार्‍या तरुणाला वाहतूक पोलिसांनी अडविले. त्यामुळे चिडलेल्या महाविद्यालयीन तरुणाने शिवीगाळ करीत वाहतूक पोलिसांच्या गणवेशाची कॉलर पकडल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) प्रथमेश शामसुंदर कवडे (वय २२, रा. श्री रेसिडेन्सी, जाधव वाडी, पंतनगर कॉलनी, चिखली) याला अटक केली आहे. प्रथमेश कवडे हा हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे.

याबाबत पोलीस अंमलदार लवंगपुरी पुरी यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार चिंचवडमधील काकडे पार्क येथील पोद्दार शाळेकडून शिवाजी उदय मंडळाकडे जाणार्‍या रोडवरील टी जंक्शन येथे सोमवारी पहाटे १ वाजून १० मिनिटांनी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर सर्व शांत असताना मुद्दाम मोटारसायकल रेस करुन प्रथमेश कवडे हा मोठमोठ्याने हॉर्न वाजवत पोद्दार शाळेकडून शिवाजी उदय मंडळाकडे जात होता. त्याच्या मोटारसायकलचा आवाज ऐकून काकडे पार्क येथील टी जंक्शन येथे फिर्यादी यांनी अडविले. त्याला नाव पत्ता विचारला असता त्याने नाव न सांगता तुला काय अधिकार आहे.

माझी गाडी अडवणारा तु कोण, तुझी नोकरीच घालवून टाकतो, असे म्हणून त्याने फिर्यादी यांच्या पोलीस युनिफॉर्म शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ केली. त्याला चिंचवड पोलीस ठाण्यात आणले असता मला येथे का घेऊन आले, असे म्हणून फिर्यादीचे अंगावर धावून येऊन फिर्यादी व पोलीस हवालदार गायकवाड यांना शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक केंबळकर तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पान टपरीतील चोरीच्या संशयावरुन तीक्ष्ण हत्याराने मारहाण करुन तरुणाचा खून

Purandar Assembly Election 2024 | पुरंदर मतदारसंघात काँग्रेसची पुनरावृत्ती की विजय शिवतारे गड जिंकणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Nirbhay Bano Campaigns | ‘निर्भय बनो’च्या सभा आता विधानसभेलाही होणार; मविआला सशर्त पाठिंबा; असीम सरोदे म्हणाले,”लाडकी नव्हे धाडसी बहीण योजना हवी”

Mantarwadi Pune Fire News | मंतरवाडीतील पेंटच्या गोडावूनला मध्यरात्री भीषण आग ! दोन टेम्पो, दोन दुचाकी ही आगीच्या भक्ष्यस्थानी (Video)

You may have missed